Top News महाराष्ट्र मुंबई

अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर…- राम कदम

मुंबई | अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह केंद्रातील राजकारण तापलं असून, राज्यातील भाजप नेते अर्णब यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट केलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार असेल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

राम कदम अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाणार आहेत. राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामींना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल

“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”

“मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवूण दाखवा”

…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

पुढील 6 महिन्यात नागपूरची सर्व वाहनं सीएनजी करा- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या