Top News राजकारण

गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक

पुणे | गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक झाल्या आहेत.  केंद्र सरकारने राज्यभरात केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात आलंय.

गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोल पंपावर लावलेले सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल, इतकं लक्षात असू द्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिलाय.

पुण्यातील मंडईत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

गेल्या 15 दिवसांमध्ये केंद्रातील भाजप सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 100 रुपयांनी वाढ केलीये. कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडलीये. अशातच गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…

अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी

“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”

नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या