बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आज गोपीनाथराव असते तर त्यांनी…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

बीड | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांचे परळी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नावरून छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे स्मृती जागवल्या आहेत.

पक्ष जरी वेगवेगळे असले तरी ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नावर एकत्र होतो. गोपीनाथ मुंडे लोकसभेत प्रश्न मांडताना भाजप काय म्हणेल याचा कधीच विचार केला नाही, असं म्हणतं छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा शाब्दिक गौरव केला आहे. तसेच मुंडे आज असते तर हे प्रश्न नक्कीच मार्गी लागले असते, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणी त्या सगळ्या जगासमोर येत आहेत. ते वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो. परंतु, ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आम्हा एकत्रित होतो, ते मला मोठा भाऊच मानायचे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एवढचं नाही तर जनगणनेचा प्रश्न खासदार समीर भुजबळांच्या यांच्या नेतृत्त्वात मांडण्याचा निर्णय झाला. तेव्हा गोपीनाथराव उपनेते होते. तेव्हा ते ताबडतोब बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं ही जनगणना झालीचं पाहिजे. पवार साहेबांना भेटले सर्वांना भेटले. 100 खासदारांनी मागणी केली की, जनगणना झाली पाहिजे अशी भूमिका गोपीनाथ मु्ंडे यांनी घेतली होती, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान,  जनगणना झाली मात्र, त्याचा जो रिपार्ट आहेे तो मोदी सरकारच्या ताब्यात आहे, त्यामुळे जेटलींंनी सांगितलं की ओबीसींची अतिशय अडचणीची परिस्थिती आहे आणि गरिबीची परिस्थिती आहे. परंतु, आकडा सांगितला नाही आणि आजही सांगत नाहीत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर केला आहे. गोपीनाथराव जर असते तर हा प्रश्न अधिक लवकर सुटला असता, अशी माझी खात्री आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.शनिवारी छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ओबीसीच्या कामासंदर्भात भरभरून कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मला विरोध करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे’; उदयनराजेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

‘तुझी मर्जी म्हणजे तुुझा अधिकार होऊ शकत नाही’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More