बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

मुंबई | देशात अनेकदा विविध कारणावरून मोठ्या प्रमाणात वाद झाला आहे. पण देशाला धार्मिक (Religion) कारणावरून झालेला वाद परवडणारा नसतो. धार्मिक कारणावरून वाद निर्माण झाला की मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टी घडतात. प्रशासन आपलं कार्य करत असताना ते कसं वादाविना करता येईल हे पाहतं. पण कधीकधी प्रशासनाच्या कठोर नियमांमुळे मोठ्या वादाला तोंड फुटत असतं.

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून विविध अवैध गोष्टींवर कारवाई चालू आहे. रस्त्यामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीला महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा दणका बसत आहे. असंच महापालिकेनं मोहने येथील मंदीरावर कारवाई केली. परिणामी कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता या वादात उडी घेतली आहे.

हिंदुस्थानात जर हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाहीत, असा इशारा भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. ज्या अधिकाऱ्याने या मंदिरावर कारवाई केली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही महापालिका आयुक्त यांच्याशी बोलणार आहोत, असं पाटील म्हणाले आहेत. मंदिरावर ज्या अधिकाऱ्यानं विनापरवानगी कारवाई केली त्याला तोडण्याची वेळ आली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रशासनाला इशारा देताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासन पाटील यांच्यावर कारवाई करणार की पालिका कर्मचाऱ्यावर कारवाई करणार याची सध्या जोरदार चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या 

हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, अधिवेशनाचा ‘हा’ पायंडा महाविकास आघाडी मो़डीत काढणार

CBSE माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं”

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More