बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गृहखाते शिवसेनेकडे दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील”

कोल्हापूर | राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. मात्र आता दोघांनीही यावर चर्चा करत स्पष्टीकरण दिलं आहे.

गृहविभागावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज नाहीत, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा रिमोट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपण गृहखाते तुमच्याकडे ठेवा अशी विनंती केली होती, हे खाते दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील असा इशाराही दिला होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायला तयार असतो, त्यामुळे भूमिका बदलणारा हा पक्ष दगा देणारा आहे, असं टीकास्त्रही चंद्रकांत पाटील यांनी सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेत्री विशाखा सुभेदारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली…

“मुख्यमंत्री नाराज नाहीत, गृहखात्यामध्ये काही कमतरता असेल तर…”

गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले…

“The Kashmir Files चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती”

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका?, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More