बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”

बीड | बीडमधील एक तरुणी स्वत:वर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यासाठी बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, त्यावेळी बीड पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या तरुणीला हीन वागणूक दिली. या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी, म्हणून पिडीत तरुणीने आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमरण उपोषण केलं आहे.

पिडीत तरुणी ही एक नर्स आहे. जर मला न्याय नाही मिळाला तर मी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर आत्मदहन करेल, असा संतप्त ईशारा या तरुणीने दिला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करुन मला न्याय द्या, अशी मागणी या पिडीतेने केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून गावातील एका वाळू माफिया आरोपीने तिच्यावर वारंवार शारिरीक अत्याचार केला. काही दिवसांनंतर आरोपी असलेल्या तरुणाच्या मामाने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर देखील हा आरोपी पिडीत तरुणीला त्रास देत होता.

या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावेळी पोलिसांनी तिला अर्वोच्च भाषा वापरली. सहा वर्ष तुला गोड लागलं. मग आता तक्रार देण्यास का आली, अशी भाषा पोलिसांनी पिडीत तरुणाीला वापरली.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

…म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो होतो; जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

पुढच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध भारत असेल- ममता बॅनर्जी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More