बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दोन दिवसांत कामावर रुजू न झाल्यास…’; प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई | राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वातावरण चांगलंच चिघळलं आहे. गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्या संप सुरु असून त्यांच्यामुळे प्रवाशांचीही कोंडी होत आहे. अशातच आता एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे.

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असतानाही ते अजूनही विलीणीकरणाच्या मागणीवर अडले आहेत. अनेक प्रयत्न करुनही कर्मचारी संप मागे घेत नसल्यानं आता एसटी प्रशासनानं आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम (Ultimatum) दिला आहे.

कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या कामावर रुजू नाही झाल्यास त्यांना कामावरुन बरखास्त करण्यात येणार असल्याचं, एसटी प्रशासनानं म्हटलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं ते जर कामावर रुजू झाले तर त्यांचंही निलंबन मागे घेण्यात येणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यामुळे आता तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More