“मी भ्रष्टाचार केला असेल तर फक्त…”, मंत्री हसन मुश्रीफांचं खुलं आव्हान
कोल्हापूर | देशासह राज्यात रामनवमी निमित्ताने अनेक विषय चर्चेत आले. रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यावरून वाद देखील झाले. अशातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे विरोधक समरजितसिंह घाडगे यांच्यात जोरदार वाद रंगला आहे.
मुश्रीफ यांनी आपल्या वाढदिवसाची खोटी माहिती दिल्याचा आरोप घाडगेंनी केला आहे. त्यानंतर आता वाद वाढण्याची शक्यता आहे. मी गेल्या 50 वर्षांपासून माझा वाढदिवस रामनवमी दिवशी साजरा करत आहे. कारण माझा जन्म रामनवमी दिवशी झाला हे सत्य आहे, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.
मी भ्रष्टाचार केला असेल तर केवळ इशारे देणार्यांनी मुहूर्त कशाला लागतो. माझा भ्रष्टाचार जरूर बाहेर काढावा, असं आव्हान मुश्रीफ यांनी घाडगेंना दिलं आहे. माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाचा विषय आता संपला आहे, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.
दरम्यान, कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात घाटगे आणि मुश्रीफ यांच्यातील वाद चर्चेचा विषय असतो. घाटगे यांनी मुश्रीफ यांनी वाढदिवसाची खोटी माहिती दिल्याबद्दल कागल पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग”
“…जरा तारतम्य ठेऊन बोलावं”, अजित पवारांनी मिटकरींना फटकारलं
मोठी बातमी! राणा दांपत्याला मुंबई पोलिसांचा झटका
“भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात”
“बंटी बबली मुंबईत पोहोचले तर पोहचू द्या, त्यांना अजून…”
Comments are closed.