बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल, तुम्हाला वाटत असेल…”

रायगड | खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्रालयीन पत्रकार संघाच्या सदस्यांबरोबर आज रायगड किल्ल्याची पाहणी केली. रायगड प्राधिकरणाने निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यातच आता छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना राज्य सरकारला इशारा दिला आहे.

जर पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून चूका होत असतील तर त्याबाबत चौकशी व्हायलाच हवी. त्याबाबत दुमत नाही. मात्र, 99 टक्के काम बरोबर झाले आणि एक टक्का चूक दिसली तर एक टक्काच पाहायची का?, असा प्रश्न त्यांनी केला आहे. माझ्याकडे यादी आहे, मी यादी काढली तर सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.

हे केव्हा पैसे देतात, किती पैसे देतात, कितीवेळा पोहोचतात?, मात्र, मी नकारात्मक बोलत नाही. हे टीमवर्क आहे. त्यांच्याही काही अडचणी असतील. मी नुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून नाही तर सगळ्यांशी उघडपणे बोलतो. जर तुम्हाला वाटत असेल तर येथे काही सुधारणा करता येतील, त्या आपण करू. हा माझा वन मॅन अजेंडा नाही, असं  संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रायगड किल्ल्यावर भानगडी चालणार नाहीत, अशी तंबी संभाजीराजे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याकरिता ही सर्वांना आलेली संधी आहे. बाकीच्याकडे भानगडी चालत असतील, पण रायगड किल्ल्यात चालणार नाहीत. ज्यांना जमत नसेल अशा अधिकाऱ्यांनी सोडून जावे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-  

“षंढ सरकारची षंढ यंत्रणा, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”

“आमंत्रण नसताना बिर्याणी खायला जाऊन परराष्ट्रीय धोरण सुधारत नाही”

रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग; युद्ध झालं तर भारताला चुकवावी लागेल ही किंमत

“सोमय्या स्वत:च्या चपलेनं स्वत:लाच मारणार, लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार”

“…तेव्हा मी आवर्जून देवेंद्रजींकडून डोसे बनवून घेतले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More