बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला दंगल भडकवायची असती तर….”; राज ठाकरे स्पष्टच बोलले…

मुंबई | संपूर्ण राज्यभर सध्या भोंग्याचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर तर याला अजून हवा मिळाली आहे. अशातच आज भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आजपासून मनसैनिकांनी आंदोलन सुरु केलं आहे.

पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा सामाजिक असून धार्मिक नाही असे म्हणत मला दंगल भडकवायची असती तर संभाजीनगरमधील सभेत भडकवली असती असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरु असताना बांग दिली गेली, त्यावेळी हे मी पोलिसांना सांगितलं, अन्यथा भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं सांगा?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

दरम्यान, ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाहीत , तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार असा इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर, मात्र…

‘…तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार’, राज ठाकरे स्पष्टच बोलले

“जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”

सर्वात मोठी बातमी! राणा दांपत्याला जामीन मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More