बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने 102 घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना बहाल करण्याचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बोलताना केंद्राचं काम अर्धवट असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली जात नाही. तोपर्यंत राज्यांना अधिकार देऊन काहीही साध्य होणार नाही. महाराष्ट्र सरकारला 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

102 व्या घटनादुरुस्ती नंतरही SEBC घोषित करण्याचे अधिकार राज्याला आहेत, अशोक चव्हाण दिशाभूल करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. जर मी चुकीचा होतो तर मग आज केंद्रीय मंत्रिमंडळाला SEBC जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना देण्याचा निर्णय घेण्याची वेळ का आली?, असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसतोय. त्यावर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता खासदार संभाजीराजे यांनी 9 ऑगस्टला बैठक बोलवली आहे. या बैठकीत आरक्षणासाठी पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“संसदेतील गोंधळाचं खापर विरोधकांवर फोडून तुमच्या त्या लोकशाहीचं श्राद्धच घाला”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

मोठी बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत पुन्हा बदल

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More