बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार? वाचा काय सांगतो ICCचा नियम

दुबई | युएईमध्ये बहुप्रतिक्षित टी-ट्वेंटी विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. भारताची पहिली लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण जम्मू काश्मिरमधील तणावाची परिस्थिती पाहता हा सामना रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सामना रद्द झाला तर पुढे आयसीसीच्या नियमानुसार काय होवू शकते यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

भारत आणि पाकिस्तान सामन्यासंदर्भात अजून भारत सरकारनं आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. तरी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि रामदास आठवले यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. सामना रद्द झाला तर आयसीसीच्या नियमानूसार पाकिस्तानला 2 गुण देले जातील. परिणामी भारताच्या पारड्यात पराभव पडल्यासारखं होईल. कारण सामना रद्द करण्याची मागणी भारताकडून होत आहे, पाकिस्तानकडून सामना खेळवण्यावर कोणतही प्रश्नचिन्ह नाही.

विश्वचषक स्पर्धा ही आयसीसीच्या नियमानूसार होत असल्यानं भारताला हा सामना खेळावाच लागणार आहे, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले आहेत. यापूर्वी भारतानं पाकिस्तानसोबत कसोटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. पण भारताला यावेळी तसा नकार देता येणार नाही.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सामान्य नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना रद्द करावा अशी मागणी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या 

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

‘या’ कारणामुळे शिवसेना खासदार भावना गवळी दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More