बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता, कट्टरतावाद कायम राहिला तर…’;, नरेंद्र मोदींनी तालिबानचे सांगितले धोके

नवी दिल्ली | अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तेथील घडामोडीवर साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीचा भारतावर परिणाम होणार नसल्याचं तालिबानने स्पष्ट केलं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-कलेक्टिव सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन ची शिखर संमेलन पार पाडलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींचा भारतासोबत त्यांच्या शेजारील देशांवर परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रादेशिक आणि सहकार्याची आवश्यकता आहे. या विषयावर जागतिक समुदायानेे एकत्रितपणे आणि योग्य विचारविनिमय करून नव्या प्रणालीच्या मान्यतेवर निर्णय घेणं आवश्यक आहे, त्यासाठी भारताचा संयुक्त राष्ट्राला पाठिंबा आहे, असं देखील मोदी म्हणाले.

अफगाणिस्तानातील शासन बदल कुठल्याही संवादाशिवाय तयार झालं आहे म्हणून ते सर्वसमावेशक नाही आहे. त्याचबरोबर अस्थिरता आणि कट्टरतावाद कायम राहिला तर जगभरात दहशतवादी आणि अतिरेकी विचारधारेला उत्तेजन मिळेल आणि इतर अतिरेकी गटांना हिंसाचाराच्या माध्यमाने सत्ता मिळण्याचं बळ मिळेल, असं नरेंंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भविष्यात ड्रग्ज, अवैध शस्त्रे आणि मानवी तस्करीचे प्रमाण अफगाणिस्तानमध्ये वाढू शकते. त्यामुळे याचा धोका साऱ्या जगाला होऊ शकतो. त्याचबरोबर मानवी संकटाचा धोका देखील संभवू शकणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत”

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More