बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला…”

मुंबई | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी आज फोटोग्राफी करत असलो असतो आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने शब्द पाळला नाही, असा सातत्याने आरोप केलेला दिसत आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज हे वक्तव्य केलं आहे.

मंत्रालयात वाॅर रूम होती, मी म्हटलं रूम आहे पण वाॅर नक्की कुणाशी करायचं? मग मी रूमचं नाव बदलून संकल्प कक्ष केलं असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काहीजण म्हणतात दिवाळीनंतर बाॅम्ब फोडेन, मी पाकिस्तानात कधी बाॅम्ब फुटतात याची वाट बघतोय, असं ,सुचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत कोणते राजकीय बाॅम्ब फुटतात याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

’46 रेल्वेस्थानकावर बाँम्बस्फोट’; रेल्वे सुरक्षा दलाला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

“एवढ गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More