बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही”

बीड | शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी करण्यात येत आहे. मात्र, बीडमध्ये महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीत, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही, असा इशारा ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आमचा पालकमंत्री आहे तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो. मात्र, बीडमध्ये  त्याउलट आहे, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये आघाडीला धर्म पाळला जात नसून अनेक शिवसैनिकांना त्रास दिला जात आहे. याबाबत मी बीडच्या पालकमंत्र्यांशी चर्चा केली असून हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. बीडमध्ये जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर उस्मानाबादेत देखील आघाडीचा धर्म पाळला जाणार नाही, असा इशारा  ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, बीड जिल्हातून ज्या तक्रारी येत आहेत त्या ऐकूण माझं डोकं फिरलं आहे. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे आम्हाला कोणी त्रास देऊ नका. दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही. त्रास दिला तर योग्य वेळेला उत्तर देऊ, असंही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. बीडमधील परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीनं घेतला ‘हा धक्कादायक निर्णय

‘मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले’; आठवलेंनी दिली संसदेत माहिती

टाटाच्या ‘या’ शेअरची कमाल; गुंतवणूकदार मालामाल

“पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय”

“महाराष्ट्र हा देशातच आहे, सांगा रे त्यांना कुणीतरी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More