देश

“अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असता”

नवी दिल्ली | अरुण जेटली आज असते तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर एव्हाना तोडगा निघाला असता, असं वक्तव्य भाजप नेते सुशील मोदी यांनी केलं आहे.

भाजपसाठी हा एकप्रकारे घरचा आहेर मानला जात आहे. सुशील मोदी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

अरुण जेटली आज हयात असते तर शेतकरी ज्याप्रकारे समस्यांचा सामना करत आहेत, आंदोलन करत आहेत, ते इतक्या दीर्घकाळ सुरु राहिले नसते. अरूण जेटली यांनी त्यावर एव्हाना नक्कीच काहीतरी तोडगा काढला असता, असं सुशील मोदी म्हणाले.

कृषी कायदे मागे घेण्यासाठी सध्या दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय विरोधकांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार”

चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट; सत्य बाहेर येताच पोलीसही चक्रावले!

“पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार”

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या