Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई | आयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेनी भाजप सरकारवर निशाणा साधला. राम अयोध्येचा राजा होता. या मंदिरासाठी शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडलं. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, असा सवाल शिवसेनेनी सामना अग्रलेखातून भाजपला विचारला. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लाज सोडली शिवसेनेने. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा, अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नेतेमंडळींकडूनच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली

मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

…तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेवटचं आंदोलन करेल- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या