बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात मग सोनिया गांधी पंतप्रधान का बनू शकत नाहीत?”

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री रामदास आठवले सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर रामदास आठवले आपल्या अनोख्या शैलीत आपलं मत मांडत असतात. अशातच आता आठवले यांनी काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांच्याविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधी या परदेशी नागरीक असणाच्या मुद्याला आठवलेंनी निरर्थक ठरवलं आहे.

अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर बोलताना रामदास आठवले यांनी जर भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकल्या तर काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी 2004 च्या निवडणुकीनंतर भारताच्या पंतप्रधानही बनू शकल्या असत्या, असं वक्तव्य केलं आहे.

याविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये पंतप्रधान व्हायला हवं होतं. जर त्यावेळी त्या हे पद स्विकारणार नव्हत्या तर मग काँग्रेसला बळकट करण्यासाठी त्यांनी पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवं होतं.

तसेच युपीएला 2004 च्या निवडणुकीत बहुमत मिळालं होतं. यानंतर सोनिया गांधींना मी पंतप्रधान व्हावं असा प्रस्ताव केला होता. माझ्या मते त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्याला काही अर्थ नव्हता, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

हृदयस्पर्शी! तहानलेल्या कुत्र्याला त्याने ओंजळीने पाणी पाजलं, पाहा व्हिडीओ

‘लोणीचोरी ही कृष्णलीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा?’; न्यायाधिशांचा निकाल चर्चेत

“चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय”

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More