बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | येत्या काळात गुजरात, उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे.

उत्तराखंडमध्ये जर आम आदमी पक्षाचे सरकार आलं तर उत्तरांखडमध्ये 6 महिन्यांत 1 लाख सरकारी नोकऱ्या आणि तरूणांना सरकारी नोकरी मिळेपर्यंत दरमहा 5,000 रूपये भत्ता दिला जाईल, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना केली आहे.

उत्तराखंडला 21 वर्षे पुर्ण झाली आहेत तरीही सत्ताधारी पक्षांनी काम केली नाहीत, त्यामुळे उत्तराखंडची परिस्थिती वाईट झाली आहे. उत्तराखंडमधील डोंगर, जंगलं, नैसर्गिक संसाधने लुटली आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये आम्ही चांगल्या योजना आखत आहोत. त्यातील फक्त एक योजना आम्ही तुमच्यासमोर आणली आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसात देशात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गुजरातच्या मु्ख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर काल लगेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या घोषणेवरून आता आम आदमी पक्ष आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखत असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

नदीच्या प्रवाहात अडकला मुलगा, तरूणीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ चुका टाळव्यात, अन्यथा गमवाल आपले प्राण!!

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणंच बाकी ठेवलंय”

61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी अन्….

पंजाबचा नवा ‘कॅप्टन’ कोण? ‘या’ दोन नेत्यांची नावं चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More