बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर..’; राजू शेट्टीचं किरीट सोमय्यांना आव्हान

कोल्हापूर | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. या बॅंकेत घोटाळा झाल्याप्रकरणी बॅंकेच्या कारभारची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. यावर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही साखर कारखान्यांचा गैरव्यवहार काढताना प्रांत, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही, देशातील सर्व साखर कारखान्यांचा घोटाळा आम्ही बाहेर काढला. किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर, प्रविण दरेकर यांच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा भ्रष्टाचारही बाहेर काढावा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे.

राज्यात महापूर येऊन दोन महिने उलटले आहेत. अजूनही शेतकरी आणि पुरग्रस्त नागरिकांना सरकारची मदत मिळाली नाही. लवकरात लवकर सरकारची मदत नागरिकांना मिळावी, ही अपेक्षा आहे. जर असं झालं नाही तर जनतेच्या उद्रेकाला समारे जावे लागेल, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. अशातच आता राजू शेट्टी यांनी किरीट सोमय्यांना दिलेल्या आव्हानाला सोमय्या काय उत्तर देणार, ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘गडकरी साहेबांचा फोन आला, अजित जरा लवकर ये…’; अजित पवारांनी सांगितला किस्सा

”हिंदू खतरे में है, हा तर भाजपचा जुमला, आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत”

राज्यात पावसाचा धोका वाढला; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

स्वाभिमानीचंही एकरकमी FRPसाठी डिजिटल आंदोलन, सहभागी होण्याचं आवाहन

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More