Top News देश

“ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन”

कोलकाता | नुकतंच भाजपत प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असं म्हटलं आहे.

दक्षिण कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत शुभेंदु अधिकारी बोलत होते. यावेळी बोलताना शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

जर तृणमूल काँग्रेसला बिहारमधून निवडणूक रणनीतिकार नियुक्त करण्याची गरज भासली असेल तर यामुळे हे सिद्ध होतं की राज्यात भाजपची वाढ होत आहे, असं शुभेंदु अधिकारी म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘या’ गावात सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव!

वादात सापडलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या दिग्दर्शकाने मागितली माफी!

“मी येत्या दोन दिवसांत मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार”

21 वर्षाचा पोरगा सगळ्यांना पुरुन उरला; सर्वात तरुण सरपंच होणार?

भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या