मुंबई | दिवसेंदिवस ऑनलाईन पेमेंटचे(Online Payment) प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पेमेंट करण्याचा एकतरी यूपीआय अॅप असतोच. त्यातली त्यात फोनपे(PhonePe, गूगल पे(GPay) या यूपीआय अॅपचा जास्त वापर केला जातो.
काहीवेळा असं होतं की, आपल्याला घाईघाईत कोणालातरी पैसे पाठवायचे असतात अशावेळी आपल्याकडून चुकून दुसऱ्याच कोणलातरी पैसे सेंड होतात. त्यामुळं अनेकजणांना टेंन्शन येतं,अशावेळी काही प्रोसेद्वारे तुम्ही हे पैसे परत कसे मिळवू शकता याची माहिती घेऊयात.
जर तुमच्याकडून चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे सेंड झाले तर वापरकर्त्याला सर्वप्रथम रिपोर्ट करवा लागतो. तसेच तुम्ही ज्या अॅपचा वापर करून पैसे पाठवले आहेत, त्या अॅपच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही पैसे परत मिळवण्याची माहिती घेऊ शकता.
परंतु जर कस्टमर केअरला काॅल करूनही पैसे परत मिळाले नाहीत तर तुम्ही एनपीसीआय पोर्टलवर तक्रार करू शकता. यासाठी तुम्ही npci.org.in या वेबसाइटवर जावा. या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्ही ‘व्हाट व्ही डू टॅब’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला यूपीआय पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही Despute Redressal Mechanism या ऑप्शनवर क्लिक करा.
वरील प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागते. त्यामध्ये यूपीआयडी, बॅंक अकाऊंट नंबर, तारीख, रक्कम, मोबाईस, ईमेल आयडी याचा समावेश असतो. यानंतर तुम्ही Incorrectly Transferred To Another Account हे तक्रारीचं कारण द्या.
वरील प्रोसेद्वारे तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर काही तासात तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या-
- 800 किमी पर्यंत धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची होतेय जोरदार चर्चा
- देश पुन्हा हादरला; प्रियकराने प्रेयसीसोबत जे केलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
- बोम्मईंची बाजू घेत एकनाथ शिंदेंनी सभागृहात दिली महत्त्वाची माहिती!
- लवासा प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले, सरकारला दिलं चॅलेंज
- ’50 खोके, एकदम ओके’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोध आक्रमक