मुस्लिम काँग्रेसच्या पाठीशी असतील तर हिंदूंनी भाजपला पाठिंबा द्यावा!

जयपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यात भाजप मंत्री हिंदू-मुस्लीम असा भेद करत मतांसाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत.

सर्व मुस्लीम काँग्रेसच्या बाजूने मतदान करत असतील तर हिंदूंनी एकजूट होऊन भाजपच्या बाजूने मतदान केले पाहिजे. जेणेकरून भाजप प्रचंड बहुमताने विजयी होऊ शकेल, असं भाजप मंत्री धनसिंह यांनी म्हटलं.

राजस्थामधील सर्व हिंदूंनी भाजपच्या पाठीशी उभं रहावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. 

दरम्यान, राजस्थानमध्ये 9 डिसेंबरला मतदान होणार असून 11 डिसेंबरला निकाल लागणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन; टीव्ही चॅनेलच्या संपादकाला अटक

-रामजन्मभूमीचं ठिकाण अटळ; ती जागा कोणीच बदलू शकत नाही!

-180 जणांना घेऊन जाणारं प्रवासी विमान समुद्रात कोसळलं

-उद्धव ठाकरे लवकरच विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडतील!

-…शेवटी अजित पवारांच्या मदतीला धावला पुतण्या!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या