बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

चंदीगड | अवघ्या भारताचं लक्ष आता पंजाबकडे लागलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर मोठ्या वेगानं पंजाबचं राजकारण बदलत आहे. पंजाब काॅंग्रेसच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री कोणाला करावं हा अधिकार सोनिया गांधी यांच्यावर सोपवला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात फुट पडू नये म्हणून पक्षश्रेष्ठी काळजी घेत आहेत. पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर अमरिंदर सिंग यांनी जोरदार टीका केली आहे. पंजाबमध्ये काॅंग्रेस संपवण्यास सिद्धू हेच कारणीभूत ठरत आहेत, असंही कॅप्टन म्हणाले आहेत. आपल्या मनासारखा मुख्यमंत्री केला नाही तर आपण काही करू शकतो, अशी धमकी हायकमांडला कॅप्टन यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री पदावरून काढण्यात आल्यानंतर अमरिंदर सिंग नाराज आहेत. राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसेच आज फोन करून त्यांनी पुढचा मुख्यमंत्री हा माझ्या गटातीलच करण्यात यावा अशी अट घातल्याचं बोललं जात आहे. परिणामी पंजाबच्या राजकारणात आता पुढे काय घडणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आज होणारी आमदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हा आजच निवडण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राग लक्षात घेता सिद्धू यांना मुख्यमंत्री केलं जाणार नसल्याचं बोललं जात आहे. म्हणून पंजाबचा नवा कॅप्टन कोणाला करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

थोडक्यात बातम्या 

टोस्ट आवडीने खात असाल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच!

“आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार”

…म्हणून मी म्हणालो माजी मंत्री म्हणू नका- चंद्रकांत पाटील

‘बिग बाॅस’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले ‘इतके’ कोटी!

नरेंद्र मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला जास्त आवडतो- प्रीतम मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More