बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर…”

मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशासह देशाचं राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे. काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष तसेच इतर स्थानिक पक्ष आता तयारी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर योगी सरकारमधील मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवाचा अवतार म्हटलं होतं. अशातचा आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये थैमान घातलं मात्र ते भारताकडे पाहू शकत नाही असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तालिबानने भारताकडे वाकड्या नजरेने बघितलं तर सर्जिकल स्टाईक होईल हे त्यांना माहिती आहे. असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

जर 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आले नसते तर चीन आणि पाकिस्तानने भारताकडे डोळे वर करून पाहिलं असतं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. यापूर्वी जिन्ना समर्थकांनी रामभक्तांवर गोळ्या पण आता दहशतवादी आणि देशद्रोह्यांवर गोळ्या घातल्या जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी सपा नेता अखिलेश यादव यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. अखिलेश यादव यांनी जिन्ना आणि सरदार पटेल यांची तुलना केली आहे. त्यांची ही टीका लाजिरवाणी असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

भारताच्या पराभवाचा पाकड्यांना आनंद! लाईव्ह कार्यक्रमात वसिम-वकार नाचले; पाहा व्हिडीओ

‘त्या’ अँथममधून जयदीप राणाचं नाव वगळलं; नवाब मलिकांचा दावा

“वाघ डरकाळी फोडू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं”

‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’; अमृता फडणवीसांचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More