बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवनीत राणा यांनी वेळीच आवाज उठवला असता तर…’; महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येवरून रूपाली चाकणकर आक्रमक

अमरावती |  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवकुमार या उप वनसंरक्षकच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं दिपाली यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं. त्यानंतर बंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमारला अमरावती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्व प्रकरणात आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिपाली यांच्या सुसाईड नोटचा काही भाग आपल्या ट्विटरवरून शेअर करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. दिपाली यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या खोट्या आरोपांच्या काही ऑडियो रेकॉर्डिंग खासदार नवनीत राणा यांना ऐकवल्या होत्या, या सर्व प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी आक्रमक होऊन, नवनीत कौर यांनी आवाज उठवला असता तर एका कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, अशी भूमिका मांडली आहे.

सध्या महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे, त्यातच एका महिला अधिकाऱ्याने जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याबरोबरच आत्महत्या करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही या गोष्टीची माहिती देऊनही त्यांनी योग्य ती कारवाई न केल्याने आता नवनीत राणा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून यासंदर्भात आवाज उठवला आहे. ट्विटमध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की, “सदर माहिती तेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एका कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो.” असं ट्विट करून चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

थोडक्यात बातम्या – 

‘दिपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर…’; चित्रा वाघ आक्रमक

दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक!

लोकांची थोडी मानसिकता केली पाहिजे ना?; अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

मॉलमधील आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More