बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर पुन्हा Lockdown लावलं जाऊ शकतं”, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | कोरोनाच्या Omicron व्हेरियंटचा धोका आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. Omicron रूग्णसंख्या देखील देशात झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेवेळी लाॅकडाऊन (Lockdown) लावण्यात आलं होतं. त्यावेळी सर्वांचेच मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. अशातच आता त्यामुळे आता पुन्हा लाॅकडाऊन लागणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Omicronच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्ली सरकार या नवीन प्रकाराचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. गरज पडल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. मात्र, आताच त्याची गरज नाही, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

मात्र, तशी परिस्थिती अद्याप आलेली नाही आणि सध्या कोणतेही निर्बंध घालण्याची गरज नाही. दिल्लीतील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. केजरीवाल म्हणाले की, शाळांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी दिल्लीतील अनेक नागरिकांचे हाल झाले होते. दिल्लीपाठोपाठ अनेक राज्यांनी लाॅकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्राने संपर्ण देशात लाॅकडाऊनची घोषणा केली होती. अशातच आता पुन्हा लाॅकडाऊनचं संकट उभा राहू नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जातंय.

थोडक्यात बातम्या-

“1 लाख जण अंगावर आले तर काय कराल?”, राज ठाकरेंचा सवाल

लग्नात जोरदार एन्ट्री करणं पडलं महागात; घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

“चौकीदारला आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता येत नाही, देश काय वाचवणार?”

ST Strike | “लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य तुमच्या हातात दिलं नाही”

“आव्हाड साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More