बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

मुंबई | कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत तर कुणाचीही टेस्ट करण्याची गरज नाही. मात्र कोरोनाची लक्षणं दिसली तर टेस्ट जरुर करुन घ्या, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे असं, राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्रिमंडळ बैठक, वर्धापन दिन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक प्रकारच्या तक्रारीकडे सरकारचं बारकाईनं लक्ष आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

आता सर्व सिस्टीम बदलल्या आहेत. पूर्वी चिकटून खुर्च्या असायच्या, आता किमान दोन मीटरचे अंतर ठेवले जाते, एक आड एक खुर्च्या असतात. कोरोनासोबत जगताना जी काळजी घ्यावी लागणार आहे, ती सर्व खबरदारी घेतली जाते, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे

सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांना टोला

‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More