बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘येत्या 8 दिवसांमध्ये अटक केली नाही तर…’, राकेश टिकैत यांचा योगी सरकारला इशारा

नवी दिल्ली | देशभर जोरदार चर्चा सुरु असलेल्या लखीमपूर घटनेनंतर आता भारतीय किसन युनियन प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची असल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसात त्यांना अटक करण्यात यावी, असा गंभीर इशारा राकेश टिकैत यांनी योगी आदित्यनाथ सरकारला दिला आहे.

येत्या 8 दिवसात अटकसत्र सुरु केले नाही तर देशव्यापी आंदोलन सुरु करु, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. यावेळी या घटनेत 4 शेतकरी आणि एका पत्रकाराला देखील त्यांचा जीव गमवावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच अजय मिश्रांनी देखील राजीनामा द्यावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. सरकारसोबत झालेल्या चौकशीनंतर सर्वांनीच समाधान व्यक्त केलं होतं, मात्र त्यानंतर सरकारने कारवाई देखील सुरु केली नसल्याचा दावा टिकैत यांनी केला आहे.

दरम्यान, लखीमपूर घटनेनंतर राकेश टिकैत आणि योगी सरकारमध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे विरोध प्रदर्शन रोखण्यात आले होते. तसेच हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख आणि जखमी शेतकऱ्यांना 10 लाखांची मदत दिली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! कोरोना लसीनंतर आता येणार ‘या’ साथीच्या रोगाची लस

आर्यन खान घरी जाणार की रवानगी पुन्हा कोठडीत होणार? आज होणार निर्णय

महिला ओरडत असतानासुद्धा चालत्या गाडीला रोखून केला अश्लील स्पर्श, निर्लज्ज गुंडांचा व्हिडीओ व्हायरल

देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढली; पण सक्रिय बाधितांची संख्या मात्र नियंत्रणात?

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More