बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही

वाशिम | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला असतानाच हळूहळू कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मागच्या दोन महिन्यात वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.

वाशिम जिल्ह्यातील वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आता कमी झाल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात फक्त 07 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

दरम्यान, नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 41 हजार 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 40 हजार 415 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात 615 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सध्या 284 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील नव्या बाधितांची संख्या कमी झाल्याने आणि एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने जिल्हाभरात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“काँग्रेसने ‘ते’ काम केलं म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला”

‘या’ दिवशी लाॅन्च होणार गुगल आणि जीयोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

महाराष्ट्रातील एकमेव आमदार! कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ ने सन्मान

आठ वर्षीय चिमुकलीनं स्वर्गाचा पत्ता टाकत लिहिलं दिवंगत वडिलांना पत्र

“नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More