मुंबई | राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं म्हटलं होतं. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील आमदारांना इशारा दिला आहे.
आमचा एकही आमदार फुटणार नाही. जर कोणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. जनताच त्यांना सळो की पळो करून सोडेल. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन आमदाराविरोधात लढू, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या दाव्यावर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना इशारा दिला आहे. जयंत पाटील यांनी बोलताना राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात एवढा निधी मिळाला नाही, असं भाजपचे आमदार सांगत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना एमआयएमच्या ऑफरवर देखील भाष्य केलं आहे. एमआयएम हा समविचारी पक्ष आहे का?, याचा विचार करावा लागेल. एमआयएम पक्षाने भाजपला असलेला विरोध आपल्या कृतीतून दाखवायला हवा, असं आव्हान जयंत पाटलांनी दिलं आहे. उत्तर प्रदेशात एमआयएममुळे सपाचा पराभव झाला. एमआयएमने अनेक मतं घेतली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, लोकांच्या आग्रहास्तव…”
‘या’ भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई?, BMC चा पुन्हा दणका
“शिवसेनेसारख्या पक्षानी महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचं बीज पेरलंय”
Deltacronचा पुन्हा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी आढळून आले नवे रूग्ण
Comments are closed.