बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमची दिवाळी जर अंधारात जाणार असेल तर, मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही”

अमरावती |  अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी  शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. रवी राणा यांनी सोयाबिनची होळी करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. “आमची दिवाळी जर अंधारात जाणार असेल तर, आम्ही मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, शेतकऱ्यांनी हे ठरवलं आहे”, असं रवी यांनी म्हटलं आहे.

सोमवारी अमरावती जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक आयोजित केली होती. बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला. त्यामुळे बैठकमध्येच बंद करावी लागली. यावर बोलताना रवी राणा यांनी  जिल्हा नियोजन समितीची बैठक केवळ पोकळ आश्वासने देण्यासाठी घेण्यात आली आहे. कुठल्याही विकास कामांसाठी पैसा दिला नाही. देण्यात येणाऱ्या निधीमध्ये 90 टक्के कपात केली आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

सोयाबिन, मुग, उडीद, कापुस, संत्रा, तुर, ऊस आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यावर बोलताना रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आश्वासने दिली. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आश्वासने दिली आहेत, असंही रवि राणा म्हणाले आहेत.

दरम्यान, जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर, महाराष्ट्रभरातला शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाईल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. रवी राणा यांनी नियोजन भवनाजवळ सोयाबिनची होळी केल्यामुळे काही वेळ खळबळ माजली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबईतील कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“वीर सावरकरांच्या नावानं राजकारण आणि आज सत्तेसाठी आंधळेपणा”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More