बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दसरा मेळावा भगवानगडावर पार पडत होता. पण मागील तीन वर्षापासून हा मेळावा आता बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव घाटमध्ये पार पडत आहे. बीडच्या भगवान भक्तीगडावर शुक्रवारी दसरा मेळावा संपन्न झाला आहे. या दसरा मेळाव्यासाठी महादेव जानकर हे देखील उपस्थित होते.

सावरगाव घाटाची निर्मिती पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडेंचे हेलिकॉप्टर नाही फिरलं तर कोणी आमदार खासदार होत नाही. पक्ष येतील आणि जातील माणूस जिवंत राहिला पाहिजे. आमची औलाद नाही. आम्ही आमच्या मनाच्या हिंमतीने उभं राहण्याचा प्रयत्न करू, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

मला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात 31 मे 2014 ला सांगितलं होतं, की पंकजा आणि प्रीतमची साथ सोडू नका. मी त्यांना शब्द दिला आहे हा महादेव जानकर मेला तरी त्यांची साथ सोडणार नाही, असा शब्द मी गोपीनाथ मुंडेंना दिला आहे असं महादेव जानकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नेता हा बनवता येत नाही. तसेच नाटक करता येत नाही. तो खरा असला पाहिजे, त्यास रक्तातून बनावं लागतं, हे लक्षात ठेवा. गोपीनाथ मुंडे नसते, तर मी मेंढरं हाकत बसलो असतो, असं जानकर यांनी या मेळाव्यात सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

“ज्यांनी परप्रांतियांच्या कानाखाली मारली त्यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ म्हणू नये”

“महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे वाघ होते, तुमच्यासारख्यांना ती उपमा देता येणार नाही”

‘कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी…’; भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे कडाडल्या

‘मला ‘या’ ठिकाणी किमान 1 तास बसायचंय’; नितीन गडकरींनी व्यक्त केली इच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More