बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचं असेल तर…”

लखनऊ | केंद्रातील सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेश निवडणुकीतून जातो असं म्हटलं जातं. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यात उत्तर प्रदेश राज्याचा सिंहाचा वाटा आहे. तब्बल 80 खासदार या राज्यातून निवडूण संसदेत जातात. परिणामी या राज्यावर पकड ठेवण्यासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळते. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लखनऊमधून मोदींना 2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यातचा चंग बांधला आहे.

लोकांना नरेंद्र मोदींना 2024 मध्ये पंतप्रधान म्हणून पहायचे असेल तर 2022 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी, असं आवाहन शहा यांनी केलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशच्या नागरिकांना दिलेली प्रत्येक आश्वासनं आमच्या सरकारनं पुर्ण केली आहेत परंतू उत्तर प्रदेशला देशातील एक क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी आम्हाला अजून पाच वर्ष सत्ता द्या, असं अमित शहा सभेला संबोधित करताना म्हणाले आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणादरम्यान काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादीचे खासदार अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. अखिलेश यांना मी आठवण करून देतो की, त्यांच्याच सरकारनं अयोध्येत रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचं काम केलं पण आम्ही आमच्या राजवटीत अयोध्येत भव्य राम मंदिर उभारत आहोत, असं अमित शहा म्हणाले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीवरून सध्या युुपीमध्ये जोरदार राजकीय वातावरण रंगलं आहे. काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी सातत्यानं युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका करताना पहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या 

अन् न्यायालयाने दिले थेट जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश

ठाकरे सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळी गिफ्ट; शिष्यवृत्तीसाठी ‘इतके’ कोटी मंजूर

“चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात, असं कानावर आलंय”

‘शेतकऱ्यांना लुटल्यावर हातपाय जोडणार नाही, तर थेट…’; वरूण गांधी आक्रमक

ऐकावं ते नवलंच! ‘या’ देशात पहिल्यांदाच आढळला कोरोना रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More