Top News नागपूर महाराष्ट्र

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फूटांचा पुतळा जाळणार!

नागपूर | वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाची पहिली ठिणगी मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी विदर्भातून पडणार आहे. त्यावेळी विदर्भात वाढीव वीजबीलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार!

पुण्यातील ‘या’ भागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’; नितेश राणेंची जहरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या