बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधींची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम 144 लावला जातो”

मुंबई | महाराष्ट्रातील मुस्लीमांना आरक्षण (Reservation for Muslims)  मिळालेच पाहिजे या मुद्द्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दावरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) पक्षानं आक्रमक पवित्रा घेतला. याच पार्श्वभूमीवर एमआयएमची (MIM) मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. याविषयी बोलताना एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

औरंगाबाद (Aurangabad) येथून निघालेली तिरंगा रॅली (Tiranga Rally) संध्याकाळी मुंबईत दाखल झाली. मुस्लीम आरक्षण (Muslim Reservation) आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे अशी एमआयएमची मागणी आहे. यातच एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर बोलताना एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम 144 लावला जातो, असा आरोप केला.

आघाडी सरकारनं मुस्लिमांचा वापर केवळ एक वोटबँक म्हणूनच केला आणि या बदल्यात मुस्लिमांना धोकाच मिळाला, असा घणाघाती आरोप ओवेसी यांनी आघाडी सरकारवर केला. मुंबई हायकोर्टाने सांगितलंय की, महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार विसरलं आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे मुंबईत मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली होती. तरीही एमआयएमचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आणि सभा पार पडली.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना लस घेण्यासाठी दिवसातील योग्य वेळ कोणती?; तज्ज्ञांचा मोठा खुलासा

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

“ज्यांच्यावर छापेमारी झाली ते काय संन्यासी होते का?, कारवाई झाली ती योग्यच”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद”

“दलालांनो… मंगळसूत्र, शेती गहाण ठेवून दिलेले पैसे घेऊन तुमची मुलं सुखी होणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More