बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न केलं तर त्यांचं मन शांत होईल”

नवी दिल्ली | सध्या विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष काॅंग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध चालू आहे. देशातील वाढत्या महागाईवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांंनी राहुल गांधी यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रामदास आठवले उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी खूप नाराज दिसतात. सातत्यानं मोदी सरकारवर टीका करत असतात. मला त्यांना सांगायचंय की, त्यांनी लग्न करावं. त्यांनी जर एका दलित मुलीशी विवाह केला तर त्यांचं मन शांत राहिल आणि ते मोदींवर टीका- टीपण्णी करणार नाहीत, असा सल्ला आठवले यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. काॅंग्रेस पक्षाचे तत्वज्ञान धर्मनिरपेक्ष आहे परिणामी त्यांनी राहुल गांधी यांनी लग्न केलं पाहिजे, असंही आठवले म्हणाले आहेत.

गांधीजींनी देशातील जातीयता नष्ट करण्याचं आदेश दिले होते. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेसला देशातील जातीयता नष्ट करता आली नाही. काॅंग्रेस पक्षच देशातील जातीयतेसाठी जबाबदार आहे, असंही आठवले म्हणाले आहेत. जर राहुल गांधींना जातीयवाद नष्ट करायचा असेल तर त्यांनी दलित मुलीशी लग्न कारवं, असा सल्ला राहुल गांधी यांना आठवले यांनी दिला आहे.

दरम्यान, आपल्या व्यवस्थेत जातीयवादाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं यावेळी आठवले म्हणाले आहेत. माझ्या पक्षासोबत ब्राम्हण मतदारांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचंही आठवले म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“ठाकरे सरकार फक्त एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे…”

…तर मी राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मी गुडघ्यावर बसण्यास तयार”, अखेर क्विंटन डिकाॅकची माघार

‘…म्हणून पाकिस्तान जिंकल्यावर मी स्टेटस ठेवलं’; माफी मागत नफीसानी सांगितलं कारण

‘अटकेपूर्वी 3 दिवस आधी…’; समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More