बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज कुंद्रा भाजपात गेले तर ‘ते’ व्हिडीओ रामायणातील होतील का?”

मुंबई | अश्लील व्हिडीओ प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली होती. त्यानंतर केंद्रातील सत्तेत असलेली भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून कलाकारांना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

ईडीने अनिल देशमुख यांना विमानतळ प्राधिकरणाबाबतीत नोटीस दिली आहे. त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र जे लोक भाजप विरोधात बोलतात त्यांच्या विरूद्धच ईडी आणि सीबीआय कारवाई करते. भाजपमध्ये काय दुधाने धुतलेले लोक आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

भाजपवर टीका करताना नाना पटोले यांनी राज कुंद्रा प्रकरणात हात घातला. उद्या जर राज कुंद्रा  भाजपमध्ये गेले तर ते व्हिडीओ रामायणातील आहेत, असं भाजप म्हणार आहे का? असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. केवळ भाजपचा विरोध केला म्हणून जर स्वायत्त असलेल्या ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात असेल तर ते चुकीचं आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राजू शेट्टी यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ प्रस्ताव

‘शरद पवारांवर आता फक्त पुस्तक यायचं बाकी आहे’; चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

“राणी बागेतील ‘पेंग्विन’ म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी”

‘भारताला महासत्ता बनायचं असेल तर…’; नितीन गडकरींनी दिला मोलाचा सल्ला

‘देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला तालिबान जबाबदार’; भाजप आमदाराचा अजब दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More