बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात एक सुचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून बघून त्यांना ‘भावी सहकारी’ म्हटलं होतं. त्यानंतर आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी भाष्य केलंय.

छगन भुजबळ यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दानवे जर उद्धव ठाकरे यांचे भावी सहकारी असतील तर चांगलीच गोष्ट आहे. राजकारणात आपले विरोधी नेते आपले दुश्मन नसतात. राजकीय वर्तुळात मतभेद असू शकतात मात्र दुश्मन नाही. कदाचित रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर?, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होतोय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याशी मी सहमत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नाही. भाजपने त्यांची सत्ता असताना शिवसेनेला कशा प्रकारे वागणूक दिली हे सर्वांना माहिती आहे. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. मात्र महाविकास आघाडीपासून इतरांना धोका असू शकतो, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपण अध्यादेशाचा मार्ग निवडला आहे. तमिळनाडू आणि इतर राज्यांनी हा मार्ग अवलंबला आहे. आमची राज्यपालांना आवाहन आहे की, त्यांनी लवकरात लवकर अध्यादेशावर स्वाक्षरी करावी, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ!

रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता- उद्धव ठाकरे

“मुख्यमंत्री महोदय तुम्ही फक्त पाठीशी उभं रहा बाकी मी बघतो”

‘…हे त्यांना रिअलाईज झालं असेल’; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More