नाशिक | सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज फाॅरवर्ड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. समाजकंटकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर आणि ग्रामीण पोलिस दलाने दिले आहेत.
अफवा पसरवणारे मेसेज अथवा फोटोग्राफ्स फॉरवर्ड करण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर सायबर अॅक्टप्रमाणे थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा हातात घेऊ नये, असं पोलिसांनी म्हटलं.
दरम्यान, मुलांना पळवणाऱ्या कोणत्याही टोळ्या शहर, जिल्हा किंवा इतर ठिकाणी कार्यरत नाहीत. नागरिकांना कोणतीही शंका असल्यास त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-अर्थशास्त्रज्ञ असलेल्या पंतप्रधानांनीच अर्थव्यवस्था खराब केली- नरेंद्र मोदी
-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला