बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

मुंबई | गेल्या 15 दिवसांपासून राज्यात चालू असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सरकारच्या मोठ्या घोषणेनंतरही संपण्याची नावं घेत नाहीयं. सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही तिढा कायम असल्याचं चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणारे भाजप नेते गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांनी जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी संप तात्पुरता मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर सदावर्ते यांनी दोघांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. संघटनेचे 3 कोटी रूपये मी खाल्ले नाहीत हा माझ्यावर खोटा आरोप करण्यात येतोय, असं सदावर्ते म्हणाले आहेत. सदाभाऊ आणि पडळकर हे माझ्या घरी दोनवेळा आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनासोबत घेऊन हे दोघे माझ्याकडं आले होते, असा गौप्यस्फोट सदावर्ते यांनी केला आहे.

सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले रेकाॅर्डींंग आणि व्हिडिओ माझ्याकडं आहेत. मी पुराव्यानिशी बोलत आहे. तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या पाया पडले होतात, असा खळबळजनक खुलासा सदावर्ते यांनी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विश्वास नांगरे पाटलांची भीती वाटत होती म्हणून माझ्या घरी आलात. पराभूत मानसिकतेतून काहीही बोलत आहेत, अशी टीका सदावर्ते यांनी पडळकर आणि खोत यांच्यावर केली आहे.

दरम्यान, सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेनंतर राज्यातील हा एसटीचा संप संपण्याऐवजी जास्त चिघळत चालल्याचं पाहायला मिळत आहे. खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरी हा संप चालूच राहणार, असं आझाद मैदानावरील कर्मचारी म्हणत आहेत. सदावर्ते हे कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयात विलीनीकरणाची बाजू मांडत आहेत.

थोडक्यात बातम्या 

सोन्याच्या भावात काय चाललंय? आज ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

“बंटी-बबली माझं काहीही वाकडं करु शकत नाहीत”

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पोटच्या मुलीवर बापाचे अत्याचार

इंजिनिअर्ससाठी खुशखबर! ‘या’ मोठ्या कंपनीत होणार मेगाभरती… भरभक्कम पगारही मिळणार

धक्कादायक! गौतम गंभीरला मिळालेली जीवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More