मुंबई | काँग्रेस पक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेते पद सोनिया गांधी लवकरच सोडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यापदासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव सुचवले जात असल्याची चर्चा सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘युपीएचे अध्यक्ष शरद पवार झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. पण युपीए अध्यक्षपदाबाबत जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. जर शरद पवारांनी ही गोष्ट स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणे योग्य नसल्याचे’ राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच ‘महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचे नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय होतील’, असेही राऊतांनी त्यावेळी सांगितले.
दरम्यान, युपीएचे अध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा कोणत्याही पातळीवर सुरु नसून, यासंदर्भात येत असलेल्या कोणत्याही बातमीत तथ्य नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
#Video- हार्दिक पांड्या म्हणतो; ….तर मुंबईत मराठीतच बोललं पाहिजे!
नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या
गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड
दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला; मनीष सिसोदियांनी केला व्हिडीओ शेअर
मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी