बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

मुंबई |  मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. कोल्हेंच्या याच वक्तव्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांना पंतप्रधान केलं पाहिजे. मुख्यमंत्री अजित पवारांना केलं पाहिजे. राजकारणात इच्छा असणं गैर नाही. पण, त्या इच्छेसाठी जे कष्ट परिश्रम करावे लागतात. मोदी देशाचे पंतप्रधान झाले म्हणून आपण मोदींकडे बघून निश्चितपणे विचार केला पाहिजे. मोदी देशाचे तेव्हाच पंतप्रधान झाले, जेव्हा त्यांच्या ह्रद्यात माझा परिवार नसून देश परिवार होता, अशी टीका मुनगंटीवार यांनी पवार कुटूंबियांवर केली आहे.

शरद पवारांचा परिवार म्हणजे माझी मुलगी खासदार, माझा पुतन्या उपमुख्यमंत्री, माझा नातु आमदार असा आहे. शरद पवारांना खरंच पंतप्रधान व्हायचं असेल तर, सर्व नातेवाईकांचा आधी त्यांनी राजीनामा घ्यावा तरच, पंतप्रधान पदाचा दरवाजा उघडला जाऊ शकतो, अन्यथा शरद पवारांचं स्वप्न स्वप्नच राहील, असा सल्ला मुनगंटीवार यांनी शरद पवारांना दिला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी कोल्हेंनी अजित पवारांना पुणे जिल्ह्यात गुंतवून नका ठेवू त्यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचं आहे. तसेच शरद पवारांना राज्यात गुंतवून न ठेवता त्यांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे, असं कोल्हे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या –

‘मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत…’; नवज्योत सिंग सिद्धूंचं मोठं वक्तव्य!

कंगणा राणावतला ‘या’ मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता?

मोठी बातमी! चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला NCB कडून अटक

शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! ड्रग्ज प्रकरणात आर्यनने केला मोठा खुलासा म्हणाला; मी ड्रग्ज…

‘ते शिवसेनेत, मी काॅंग्रेसमध्ये आहे मग…’; साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More