Top News राजकारण

शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर…- एकनाथ खडसे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आलाय. दरम्यान शरद पवारांच्या या दौऱ्याबाबत एकनाथ खडसे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्या सांगण्यानुसार, शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द झाला नसून तो स्थगित करण्यात आलाय. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरच्या शरद पवारांच्या या दौऱ्याचं राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व मानलं जात होतं.

एकनाथ खडसे म्हणाले, “शरद पवारांच्या दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता प्रशासनाने परवानगी देण्यास नकार दिलाय. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अडचणीचं ठरेल. यामुळेच दौरा रद्द नाही तर स्थगित करण्यात आलाय.”

शरद पवार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे तसंच नंदुरबारमध्ये होणारा शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार होते.

महत्वाच्या बातम्या-

“अख्खा दिवस गेला पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट किंवा मसेजही दिसला नाही”

योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन!

ज्यांना पटत नसेल त्यांनी पक्ष सोडून बाहेर जावं; कपिल सिब्बल यांच्यावर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या