बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित ठाकरेंची भाऊ आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले…

मुंबई | गेल्या महिन्यापासून राजकारणात मोठा सत्तासंघर्ष झालेला आपण पाहायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde)यांनी शिवसेनेचे फुटीर आमदार घेऊन भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली. तेव्हापासून ठाकरे कुटूंबावर राजकारणात सतत टीका केली जात आहेत. मनसेच्या नेत्यांनी देखील ठाकरेंवर आतापर्यंत जोरदार निशाणा साधला होता. त्यात आता मनसेचे(MNS) प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांचा मुलगा अमित ठाकरे(Amit thackeray) यांनी आदित्य ठाकरेंना(Aditya Thackeray) चांगलेच धारेवर धरले आहे.

सध्या आदित्य ठाकरे हे शिवसंवाद या कल्पनेतून आपल्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधत आहेत. यामुळे ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आता या दौऱ्यावर अमित ठाकरे यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. जर एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर तुम्ही हा दौरा केला असता का?,एवढाच माझा प्रश्न आहे, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

सध्या अमित ठाकरेही शनिवारपासून चार दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आणि तो निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. कुठलीही निवडणूक असु द्या मला बोलवा आपण जोरदार प्रचार करूया. पक्षाने केलेली कामे आणि विचार घरोघरी पोहोचवू, असंही ते म्हणालेत.

लोक आपल्यावर विश्वास ठेवतील आणि निवडूण देतील, आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि ती जिंकायची देखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो कामाल लागा, असंही अमित ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले. या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचंही मोठ्या उत्सहात स्वागत केेलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”

संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत

आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More