बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

मुंबई | आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे. काल पहिल्या दिवशीच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहामध्ये खूप राडा झाला. अध्यक्षांच्या दालनात येऊन धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यामुळे  भाजप नेते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज सभागृहामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष म्हणून नाही, तर भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आम्ही करतो. त्यामुळे मला वाटतं की, मोठ्या मनाने विरोधकांना बोलावून चर्चा केली पाहिजे. त्यानंतर कारवाई करायची असेल तर करावी. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जर कुणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल, अशी अवस्था याठिकाणी होणार असेल तर लोकशाहीला योग्य नसल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच जी घटना घडली, तिथे दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. पण मी स्वतः त्यांना मागे केलं. भांडण होऊ दिलं नाही. त्यामुळे असा प्रस्ताव आणणं योग्य होणार नाही.

विरोधीपक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशाराच दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

‘भास्कर जाधव यांना संरक्षण देणार’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत ग्वाही

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More