मुंबई | वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधिकारी जाधव आणि मराठा संघटनांकडून माझ्या जिवाला धोका आहे. उद्या माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाच्या निकाल हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग करणारा आहे. या निर्णयाला लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं, सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
उच्च न्यायालयाने दिलेले मराठा आरक्षण घटनाबाह्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेविरोधी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्यावर याआधी एकदा हल्ला झाला होता.
महत्वाच्या बातम्या-
-आरक्षण मिळालं… आज माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं चीज झालं- चंद्रकांत पाटील
-आरक्षणाच्या निर्णयाने आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागणार नाही- गिरीश महाजन
-कोर्टात मराठा आरक्षणासाठी लढणारा तो एक मराठा!
-मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लिम आरक्षणाबाबत अबू आझमी विधानसभेत आक्रमक
-आम्ही पावले उचलली होती… त्यावेळी शक्य नाही झालं पण आता प्रत्यक्षात- विरोधी पक्ष
Comments are closed.