बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

मुंबई | आताकुठे राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असून रूग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र असं जरी असली तरी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने यावर्षीचं पावसाळी आधिवेशन केवळ दोन दिवसांचं होणार असल्याचं सांगितलं आहे.

या निर्णयामुळे विरोधीपक्षीय नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे. अशातच भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी या आधिवेशनाच्या मुद्यावरून भाष्य केलं आहे. 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

14 दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे ठाकरे सरकारला जास्त दिवस आधिवेशन ठेवायला भीती वाटत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अधिवेशाच्या मुद्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत”

शिवसेना-भाजप युतीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

विजय शिवतारेंच्या मुलीचे खळबळजनक आरोप, फेसबुक लाईव्हद्वारे आईचं प्रत्युत्तर

तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही-धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More