बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरोप सिद्ध झाल्यास मी राजीनामा देतो, नाहीतर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीवरून आमदार रवी राणा आणि महिला आणि बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर जमीन हडपल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

रवी राणा स्वत: ला शेतकऱ्यांचे कैवारी दाखवून नौटंकी करत आहेत. रवी राणा यांनी एका शाळेची आणि मेळघाटातील आदिवासींची जमीन हडपली आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध करा, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

माझ्यावरील आरोप 15 दिवसात सिद्ध करा आणि आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो, असं आव्हान रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना दिलं आहे. तसेच आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या, असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमरावती येथे सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा वादग्रस्त ठरल्याने बैठक मध्येच बंद पडली. रवी राणा यांनी नियोजन भवनाजवळ कुजलेल्या सोयाबिनची होळी केली होती. दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा तुम्हाला दिवाळी साजरी करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका रवी राणा यांनी घेतली होती. आता अमरावतीमध्ये राणा विरूद्ध ठाकूर सामना रंगल्याचं पाहायला मिळतयं.

थोडक्यात बातम्या- 

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More