बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बँक बुडाली तर…’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई | गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. तर त्याआधीच्या वर्षात भारतातील अनेक व्यवसाय महागाईमुळे संकटात सापडले होते. त्यामुळे मागील तीन वर्षापासून या आर्थिक संकटामुळे देशातील काही बँका देखील मोठ्या अडचणीत सापडल्या होत्या. त्यामुळे सरकारला काही बँकांचं एकत्रीकरण देखील करावं लागलं होतं. त्यातच आता बँकेतील ठेवीदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

अडचणीत सापडलेल्या बँकेत ज्या लोकांच्या ठेवी आहेत, त्या ठेवीदारांना 5 लाख रूपयेपर्यंतची रक्कम 90 दिवसात परत करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे. यावर सरकार लवकरच मोठी पावले टाकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. बुधवारी निर्मला सितारमण यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे.

आवश्यक ठेव विमा आणि पतहमी मंडळाच्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडण्यात आला होता. त्याला आता मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. या कायद्याद्वारे ठेवीदारांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. यात पात्र रकमेची मुदत 1 लाखाहून 5 लाखापर्यंत असणार आहे. या कायद्यामुळे 98.3 टक्के ठेवीदारांना फायदा होणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे.

दरम्यान, नव्याप्रकियेनुसार बँक आर्थिक संकटात असल्याचं सरकार जाहीर करेल, त्यानंतर 45 दिवसात याची पुर्तता करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता बँका जरी आर्थिक संकटात सापडल्या तरी ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचं मिळू शकणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर!

जयंत पाटलांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More